परिचय
नांव: श्री. उज्ज्वल प्रभाकर पावले
छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
मूळ गांव: पैठण.
जन्मदिनांक: २४ नोव्हेंबर, १९६५
शिक्षण: एम्. ए. (वेदांग ज्योतिष), वास्तु पदविका.
(कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक)
इ. स. १९८६ ते १९९८ पर्यंत लुपिन या औषधी कंपनीत सेवारत.
१९९८ ते २००१ अजंता फार्मा (मॉरिशस) लि. या कंपनीत सेवारत.
मॉरिशसहून परतल्यावर ज्योतिष्यादी विषयांकरिता सहायक असे सॉफ्टवेअर वितरक व विक्रेता म्हणून स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
गूढ शास्त्रांचे लहानपणापासूनच आकर्षण असल्यामुळे, नंतर स्वत:चा व्यासंग जोपासायचा निर्णय घेतला.

केवळ स्वअध्ययनावर समाधान होईना; त्यामुळे विधिवत शिक्षण घेण्याची आवश्यक्ता वाटू लागली.
रवि महादशेत तसा योग आला आणि आज पूर्ण वेळ ज्योतिष व तत्सम विषयांमध्ये काम करण्यात धन्यता मानत आहे.
२०१४ या वर्षात वेदचक्षुची स्थापना केली.
या गृपच्या माध्यमातून ज्योतिष शास्त्राचा प्रचार, प्रसार सुरू केला.
खास लोकाग्रहास्तव विविध विषयांवर तज्ञ अभ्यासंकांच्या कार्यशाळांचे आयोजन केले.
या कार्यात श्री. अतुलकुमार कुलकर्णी
श्री. अभयशास्त्री सोनवणे सौ. मुग्धा सारंग रानडे सौ. सुप्रिया भारस्वाडकर सौ. सुषमा नलावडे श्री. सौरभ नाफडे यांचे सहकार्य, सौजन्य लाभले.
यांशिवाय, अनेक संस्था व स्वयंसेवकाच्या उत्स्फूर्त मदतीने वेदचक्षु टिम दिवसेंदिवस बळकट होत आहे.
लॉक डाऊनच्या काळात झूम आणि युट्युबच्या माध्यमातून सुरुवातीला सॉफ्टवेअरच्या डेमो करिता काम करण्याचे ठरविले.
मनात अनेक दिवसाची संपूर्ण व्याख्यान आयोजित करण्याची एक सुप्त इच्छा होती. तिला मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले. आणि व्याख्यानाचे एका आठवड्याचे आयोजन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे एकशे एक व्याख्यानाचा संकल्प केला.
३ जून ते १५ सप्टेंबर, २०२० या काळात हा संकल्प पूर्णत्त्वास गेला.
यात ईश्वरेच्छा, ईश्वरकृपा सर्व गुरुजनांचे आशिर्वाद, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या शुभेच्छा तसेच उत्सुकता असलेले असंख्य ज्ञानपिपासू ज्योतिषी, ज्योतिष प्रेमी श्रोते, दर्शक यामुळे हे शक्य झालं असं मी समजतो.
मोफत व सशुल्क मिळून आतापर्यंत एकूण सुमारे ३००० हून अधिक कार्यक्रमांची नोंद आहे.
१०१ कार्यशाळांचा संकल्प आहे. त्यापैकी ७५ कार्यशाळा झाल्या आहेत.
सर्व संस्थांचे सहकार्य लाभल्यास १०१ ऑनलाईन अधिवेशनं घ्यावेत, असाही मानस आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेतून फलादेशाची तयारी करून, मराठी ज्योतिषी सक्षम व्हावा यांकरिता व्यापक प्रयत्न सुरू आहेत.
लॉकडाऊन व अनलॉक काळातील पुरस्कार:
१) ई ज्योतिष प्रचारक मराठी ज्योतिष मंडळ.
(१९ ऑक्टोबर, २०२०)
२) कार्यगौरव पुरस्कार बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ, पुणे.
(१६ ऑक्टोबर, २०२०)
३) ज्योतिष कृतज्ञता मानपत्र
आदिशक्ती वास्तु-ज्योतिष, नाशिक.
(२४ नोव्हेंबर, २०२०)
४) ज्योतिर्मयी ज्योतिषी, वास्तुज्योतिष मित्रमंडळ
(२४ नोव्हेंबर, २०२०)

५) मानपत्र स्मार्ट ॲस्ट्रॉलॉजर गृप, पुणे. (२६ जानेवारी, २०२१) ६) मानपत्र
श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव.
(९ जून, २०२१)
७) तेजोवलय पुरस्कार, श्री सनातन ज्योतिष विद्या फाऊंडेशन, सिन्नर.
(२५ जुलै, २०२१)
८) महाराष्ट्र ज्योतिष भूषण, ऋषी गुढशास्त्र संस्था, मुंबई.
(१९ फेब्रुवारी, २०२२)
९) जीवनगौरव पुरस्कार
महिला.ज्योतिर्विद, पुणे
(२८ जानेवारी, २०२३)
१०) कार्यगौरव पुरस्कार
श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी
(७ मे, २०२३)